पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोपीनाथ मुंडे असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो: एकनाथ खडसे

भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे

गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्या दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मनातील खदखद व्यक्त केली तसंच त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 'ज्यांनी ४० वर्ष खस्ता खाल्या. पक्ष मोठा केला त्यांना आता पक्षात गुदमरल्या सारखे वाटत आहे. पक्षातून काढत नाही. तर आपोआप पक्षातून गेले पाहिजे ही निती सध्या सुरु आहे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. दरम्यान, मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो, असे खडसे यांनी यावेळी सांगितले.

हैदराबाद एन्काऊंटर: माजी न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी

'आज ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाचे मला आदेश आहे की पक्षाविरोधी बोलू नका. पण मी कधीच पक्षाविरोधी बोललो नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. आज जे पक्षाचे चित्र आहे ते जनतेला मान्य नाही. मुंडेसाहेंबांनी आख्खं आयुष्य पक्षासाठी घालवले. त्यामुळे तुम्ही मुंख्यमंत्री झाला, असल्याचा टोला एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना लगावला आहे. मुंडेंनीच फडणवीसांना पक्षाचे अध्यक्ष केले. मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. 

शिवसेनेशिवाय अशा पद्धतीने भाजपने राज्यसभेत आपले आकडे

दरम्यान, मुंडेसाहेबांनी जो संघर्ष केला ती वेळ आमच्या जीवनात आली असल्याचे खडसे यांनी सांगितले. पंकजाला बोलता येत नाही. मात्र तिच्या वेदना मला माहिती आहे. दुसऱ्याला साथ देऊन पाडायचे हे माहिती आहे. हे घडलं नाही तर घडवले आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे. मुंडेंच्या मतदार संघात पंकजाचा पराभव झाला याचे दु:ख झाले आहे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात IUML सुप्रीम कोर्टात

दरम्यान, 'जास्त बोललो तर शिस्तभंग होईल. आधीच तिकीट कापले आहे, असा टोला खडसेंनी पक्षाला लगावला आहे. जनतेला खात्री आहे पण त्यांना खात्री पटत नाही. माझ्या आणि गोपीनाथ मुंडेंच्या जीवानत जो प्रसंग आला तो पंकजाताईंच्या जीवनात येऊ नये, असे मला वाटत असल्याचे खडसेंनी सांगितले. माझ्याजवळ बोलण्यासारखे खूप काही आहे. फक्त इथे बोलायला वेळ नाही. जुन्या आठवणी काढल्या तर जीवाची घाळमेळ होते, अशी खदखद खडसेंनी यावेळी व्यक्त केली.  

काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार