कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने देशभरात लॉकडाऊन घोषीत केला. या लॉकडाऊनच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी केंद्र सरकारने जनतेला मोफत धान्य वाटपाची घोषणा केली. धान्य वाटपासाठी केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवली नाही मात्र राज्य सरकारने अनेक अटी ठेवल्या असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांनी शुक्रवारी ट्विट करत राज्य सरकारवर आरोप केला आहे.
आगामी 3 महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 3, 2020
आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरूपाच्या या अटी आहेत. #IndiaFightsCorona pic.twitter.com/fFWVvhTrip
दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधित बाळासह आईचा रिपोर्ट निगेटिव्ह
फडणवीस यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'आगामी ३ महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरूपाच्या अनेक अटी घालण्यात आल्या असल्याचे फडणवीसांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्य सरकारने धान्य वाटपासाठी घातलेल्या अटी मागे घ्याव्यात अशी विनंती केली.
कोविड १९ : रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्टची नियमावली शनिवारी जाहीर होणार
दरम्यान, आज गरिबांना धान्य मोफत मिळणे अतिशय आवश्यक आहे. रेशन कार्ड असो वा नसो, धान्य देण्याचेच निर्णय अन्य राज्यांनी सुद्धा घेतले असल्याचे फडणवीसांनी सांगितले. तसंच, केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, ३ महिन्यांसाठी आवश्यक धान्यापैकी ९० टक्के कोटा उपलब्ध झाला आहे. उर्वरित २ दिवसात उपलब्ध होईल. त्यामुळे ३ महिन्यांचे धान्य राज्य सरकारने एकत्र द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
मोदींच्या आवाहनावर आव्हाड-मलिकांची टीका तर रोहित पवारांकडून स्वागत