पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाराजीबाबत माझे मत कायम; फडणवीसांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमध्ये एकनाथ खडसे यांची भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन देखील त्यांच्यासोबत होते. खडसे, फडणवीस आणि महाजन यांच्यामध्ये तब्बल अर्धातास बैठक झाली. या बैठकीतून खडसेंच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले असल्याचे सांगितले जात होते. मात्र नाराजीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. फक्त जिल्हा परिषदेबाबत चर्चा झाली असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

बगदाद विमानतळावर रॉकेट हल्ला; टॉप कमांडर कासिम सोलीमनी ठार

धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस दोन दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांची जळगावमध्ये भेट घेतली. या बैठकीनंतर खडसे यांनी सांगितले की, 'आज अन्य कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही. जिल्हा परिषदेबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाली. नाराजीबाबत माझे मत कायम आहे. त्यावर वेगळी चर्चा करता येईल, असे त्यांनी सांगितले.  

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आंबिवलीजवळ डंपरची रेल्वेगेटला धडक
 
एकनाथ खडसे नाराज असून वारंवार ते आपली नाराजी व्यक्त करताना दिसतात. आतापर्यंत अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या खडसेंनी फडणवीस आणि महाजन यांचे नाव घेऊन टीका केली होती. 'स्वत:चे राजकारण सरळ करुन घेण्यासाठी फडणवीस आणि महाजन यांनी जाणीवपूर्वक माझं तिकीट कापलं असल्याचा खळबळजनक आरोप खडसेंनी केला होता. आज खडसे-फडणवीस-महाजन यांची भेट झाली. या भेटीतून त्यांच्यामधील वाद मिटेल असे सांगितले जात होते. मात्र या बैठकीत नाराजीबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे खडसेंनी सांगितले. 

नेपाळी दिसतात म्हणून दोन बहिणींना पासपोर्ट नाकारला