पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवेंद्र फडणवीसांना नागपूर कोर्टाकडून जामीन मंजूर

देवेंद्र फडणवीस

माजी मुंख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. नागपूर कोर्टाने फडणवीस यांना जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर फडणवीसांना जामीन मंजूर झाला आहे. २०१४ च्या निवडणूक शपथपत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती दडवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. याप्रकरणी नागपूर कोर्टाने फडणवीस यांना समन्स बजावला होता. त्यानुसार फडणवीस आज कोर्टात हजर राहिले. याप्रकरणाच्या सुनावणीची पुढची तारीख कोर्टाने दिली आहे.

निर्भया प्रकरणातील दोषी विनयने आपटले भिंतीवर डोके, किरकोळ जखमी

कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर माध्यामांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, 'हे प्रकरण साधारण १९९५ ते १९९८ दरम्यानचे आहे. झोपडपट्टी काढण्यासंदर्भात कारवाई सुरु असताना आम्ही एक आंदोलन केले होते. त्यावेळी आमच्यावर गन्हे दाखल झाले होते. त्यावेळी दोन गुन्हे माझ्यावर दाखल झाले होते.' तसंच, 'निवडणूक शपथपत्रात कोणत्याही हेतूने माहिती लपवण्याचा प्रयत्न केला गेला नाही. कनिष्ट कोर्टाने समन्स बजावल्याने आज मी हजर राहिलो.', असे फडणवीसांनी सांगितले. 

आग्रामध्ये प्रशासनाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारमुळे टेन्शन!

फडणवीसांनी पुढे असे सांगितले की, 'माझ्यावर कोणतेही वैयक्तीक गुन्हे नाहीत. ते फक्त आंदोलनाचे गुन्हे आहेत. त्याची नोंद मी निवडणूक शपथपत्रात केली होती. मी सर्व गोष्टी कोर्टासमोर मांडल्या आहेत. निश्चितपणे मला न्याय मिळेल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, 'हे असे गुन्हे नाहीत ज्यामुळे माझ्या निवडणुकीवर काही परिणाम होईल. माझ्यावरचे सर्व गुन्हे सामान्य जीवनामध्ये लोकांसाठी संघर्ष करण्यासाठी झाले आहेत. याच्या पाठीमागे कोण आहे ते योग्यवेळी बाहेर येईल, असे देखील फडणवीसांनी सांगितले. 

तामिळनाडूतील बस- ट्रकच्या भीषण अपघातात २० जण ठार, १५ गंभीर जखमी