पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली: फडणवीस

देवेंद्र फडणवीस

सत्तेची लाचारी सावरकरांचा अपमान सहन करणारी असेल, तर ती काय कामाची? असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली असल्याचा आरोप करत सावरकरांबद्दल बोलण्यास आम्हाला कोणी थांबवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तसंच, स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचं दैवत आहेत. राहूल गांधी माफी मागत नाही तोपर्यंत हा लढा सुरुच राहणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. 

आधी हिंसा थांबवा, आंदोलक विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाने सुनावले

विधानसभेत आम्हाला सावरकरांबद्दल बोलून दिले जात नाही. हे चूकीचे आहे. सभागृहात बोलू दिले नाही तर सभागृहाबाहेर लढा सुरु ठेवू. उद्या जर आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल, असे फडणवीस यांनी सांगितले. जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील जनात त्यांना माफ करु शकत नाही, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.  

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

दरम्यान, 'मी राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी आहे' या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. हिवाळी अधिवशेनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु आहे. भाजपचे सर्व आमदार 'मी पण सावरकर' असे लिहिलेली टोपी घालून विधानसभेत आले आहेत. वेलमध्ये उतरुन भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.  

पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक, 'उद्धव ठाकरे होश मैं आओ'च्या घोषणा