पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जनतेचा कौल नाकारुन स्वार्थासाठी आलेले हे सरकार'

देवेंद्र फडणवीस

जनतेने दिलेला कौल नाकारुन स्वार्थासाठी आलेले हे सरकार असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.   राज्यात सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या होत्या. भाजपने ७० टक्के जागा जिंकल्या होत्या. मात्र ४० टक्के जागा जिंकलेले तीन लोकं एकत्र आल्याने हे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार जनतेच्या मनातले सरकार नाही. तर सत्तेच्या स्वार्थापोटी आलेले सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. 

सुधारित नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

'आमच्यासोबत येण्याऐवजी शिवसेनेने दुसरा मार्ग पत्करला. जनादेश नसताना देखील काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आली. हे जनादेशाने आलेले सरकार नाही. तर राजकीय हाराकिरीने आलेले सरकार आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी दैनिक सामनाचे दाखले वाचून दाखवले यावरुन सत्ताधाऱ्यांनी गोंधळ केला. त्यावरुन सत्ताधाऱ्यांना झोंबतंय तर आजपासून सामना वाचत नाही, असे फडणवीसांना सांगितले. 

एकनाथ खडसे खरंच भाजपला अलविदा करणार का याकडे

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले की बाळासाहेबांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल. आम्हाला सगळ्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आदर आहे. पण, बाळासाहेबांना दिलेला शब्द हा होता की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री होईल? तसंच, काँग्रेससोबत जाऊ हा शब्द बाळासाहेबांना दिला होता का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी