पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्याची कवायत करत आहेत'

देवेंद्र फडणवीस

'मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्याची कवायत करत आहेत. दोन्ही सहकारी पक्षांना खुश करण्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  दोरीवरच्या कसरतीमुळे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोडांला पानं पुसली आहेत. शेतकऱ्यांना २५ हजारांच्या मदतीचे काय झाले? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

 

... तर ज्ञानदेव म्हणाले असते अच्छे दिन येईचिना - उद्धव ठाकरे

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. तसंच, अभिभाषणा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देखील उत्तरं दिली नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी देखील ते काहीच बोलले नाही. त्यामुळे या शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार करत आम्ही सभात्याग केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

'मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर २३ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार'

दरम्यान, मुख्यमंत्री शिवजी पार्कमधील सभेत भाषण करत असल्यासारखे बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण काळ्या दिवसासारखे होते, अशी टीका फडणवीस यांनी केली आहेत. तसंच, हे सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे सरकार आहे. शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही धिक्कार करतो, असे फडणवीस यांनी सांगितले. 

NDA तून बाहेर पडलो असलो, तरी आम्ही UPA सोबत नाही - संजय राऊत