पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जनतेने सरकारचा राजकीय सातबारा कोरा करुन घरी पाठवले पाहिजे'

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्या सरकारने शेतकऱ्यांशी बेईमानी केली आहे. राज्य सरकारची कर्जमाफी फसवी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जनतेने या सरकारचा राजकीय सातबारा कोरा करुन यांना घरी पाठवले पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले. तसंच, सरकारने जनादेशाचा विश्वासघात केला आहे. हा विश्वासघात फक्त जनादेशाचा नाही तर शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

माझी निष्ठा कुठं कमी पडली, भास्कर जाधवांचा सवाल

पालघरमधील डहाणू तालुक्यातील कासा येथे कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्या दरम्यान, सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी, सातबारा कोराची घोषणा या मुद्द्यांवरुन फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. शिवसेनेने जनादेशाशी बेईमानी केली त्यामुळे आम्हाला विरोधात बसावे लागले, असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. वर्गात पहिला आला त्याला वर्गाबाहेर बसवले. तीन पक्षांचे सरकार कधीच टीकणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. 

जे घडले ते चुकीचे आणि निंदनीय आहे: संग्राम थोपटे

नवीन सरकारने शेतकऱ्यांना २५ हजार रुपये देतो असे सांगितले मात्र त्यांच्या हातात भोपळा दिला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. आम्ही जाहीरनाम्यात सांगितले नव्हते की कर्जमाफी देऊ. पण शेतकरी अडचणीत आले तेव्हा आम्ही दीड लाखांपर्यंचे कर्ज माफ केले. ५० लाख शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा झाला होता, असे फडणवीस यांनी सांगितले. मात्र आता सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये एकही शेतकरी बसत नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 

कर्ज वसुलीसाठी विजय मल्ल्याची संपती विकणार; पीएमएलए

दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर झाला असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर होईल असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का असा प्रश्न मी केला होता. मात्र यावर ते उत्तर देऊ शकत नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. बाळासाहेबांना स्वर्गात काय वाटत असेल याची कल्पना करु शकत नाही, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. सत्तेसाठी शिवसेना कुठल्याही थराला जाऊ शकते. आताचे सरकार राज्यात टिकू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

चांद्रयान-३ ला सरकारची मंजुरी, २०२० इस्रोसाठी महत्त्वाचे वर्ष