पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे

चंद्रकांत पाटील

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी  राज्यातील  शेतकरी आणि सामान्य जनता  सुखी होऊ दे, असे साकडे चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. या पूजेनंतर संत तुकाराम भवन येथे चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे (४२ वर्ष) आणि नंदा ओमासे (३५ वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. 

मानाचा वारकरी

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

‘यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातीला दुष्काळस्थिती त्यानंतर महापूराला सामोरे जावे लागले होते आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने अनेक उपाययोजना केल्या. तसंच केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे’, चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

INDvBAN: वादळ घोंगावलं, पण रोहितचं! भारताची मालिकेत

तसंच, गेली तीन चार वर्षे आषाढी वारी 'निर्मल वारी' करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे. याठिकाणी मोफत गॅस सिलेंडर तसेच शेगडी मिळेल अशी व्यवस्था शासनाकडून करण्यात येईल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या! अन्यथा तीव्र आंदोलन करु : राजू शेट्टी

दरम्यान,  मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावचे आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला आहे.

फडणवीसांना मुख्यमंत्री करुन दाखवा, राऊतांचे भाजपला चॅलेंज