नीरा देवधर धरणातील बारामतीला जाणारे पाणी आता नीरा उजव्या कालव्याला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे माढ्याला ६० टक्के पाणी हे पिण्यास आणि सिंचनासाठी वापरता येणार आहे. सरकारने या निर्णयातून शरद पवार आणि अजित पवार यांना दणका दिल्याचे बोलले जात आहे. माढामध्ये फटाके वाजवून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. या निर्णयानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यातही आले.
'EVM मध्ये नाही, तर निवडणूक अधिकाऱ्याकडील मशीनमध्ये गडबड'
नीरा देवधरचे १९५४ साली वाटप करताना पुणे-बारामती पाणी घेत असलेल्या डाव्या कालव्यात ४३ टक्के तर सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर पाणी घेत असलेल्या उजव्या कालव्याला ५७ टक्के देण्याचा निर्णय झाला होता. २००९ मध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री झाल्यावर त्यांनी करार बदलत दुष्काळी उजव्या कालव्याचे सुमारे ११ टीएमसी पाणी बारामतीकडे डाव्या कालव्यात वळवले होते, असे वृत्त 'एबीपी माझा'ने दिले आहे. हे पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी खासदार रणजित नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रयत्न केले होते.
RSS ची विचारधारा देशासाठी घातकः शरद पवार
त्यानंतर स्वतः शरद पवार आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. परंतु, त्यांच्या या भेटीचा काही फायदा झाल्याचे दिसत नाही. भाजप सरकारने आता पुन्हा एकदा १९५४ च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय घेतला.