राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने महाराष्ट्रातून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेत राज्यातून भाजपच्या कोट्यात तीन जागा आहेत. तिसरे नाव अद्यापही गुलदस्त्यातच आहे. भाजपचे निष्ठावंत नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चाही सुरु होती. त्यांना संधी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजप प्रवेशामागे या नेत्याचा महत्त्वाचा रोल
BJP announces the names of party's candidates for the upcoming election to the Rajya Sabha. https://t.co/sQItPuDotq pic.twitter.com/FAjziadv2Q
— ANI (@ANI) March 11, 2020
राज्यसभेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपने बुधवारी एकूण ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात ९ उमेदवार हे भाजपचे असून मित्रपक्षांमधील रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्यासह आसाममधील बीपीएफ पक्षाच्या बुस्वजीत डायमरी यांच्या उमेदवारीचा समावेश आहे. २६ मार्च रोजी राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. १३ मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राज्यात भाजपकडून तिसरा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता असून उद्यापर्यंत या नावाची घोषणा होणे अपेक्षित आहे.