पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खंडणीप्रकरणात अभिजित बिचुकलेंना न्यायालयीन कोठडी

अभिजित बिचुकले

बिग बॉस मराठी पर्व २ मधले सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धक अभिजित बिचुकले यांना चेक बाऊन्स प्रकरणी जामिन मंजूर करण्यात आला आहे. मात्र  खंडणीप्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचं एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. 

बिचुकलेंना शुक्रवारी सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या सेटवरून अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात आज झाली. चेक बाऊन्स प्रकरणी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला मात्र २०१२ मधील खंडणी प्रकरणात त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. 

 तब्येतीचं कारण देत बिचुकले  हे काल साताऱ्यातील रुग्णालयात भरती झाले होते. जुने प्रकरण उगाचच उकरून काढलं जात आहे, आपल्याला घराबाहेर काढण्याचा हा राजकीय कट आहे असा आरोप त्यांनी संबधित वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. 

कवी मनाचे  नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले हे साताऱ्याचे आहे. बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त स्पर्धक म्हणून ते ओळखले जायचे. या आठवड्यात साप्ताहिक कार्यादरम्यान स्पर्धक रुपाली भोसलेला शिवीगाळ केल्यामुळे त्यांनी वाद ओढावून घेतला होता.