पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉस'च्या घराबाहेर काढण्यासाठी राजकीय कट रचला, बिचुकलेंचा आरोप

अभिजित बिचुकले

'मला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्याचा हा राजकीय कट आहे, जुने प्रकरण मुद्दाम उकरून काढण्यात आले आहे', असा आरोप राजकीय नेते आणि या खेळाचे स्पर्धक  अभिजित बिचुकले यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.  चेक बाऊन्स प्रकरणात अभिजित बिचुकले यांना शुक्रवारी दुपारी बिग बॉसच्या सेटवरून सातारा पोलिसांनी अटक केली होती. आता  तब्येतीचं कारण देत बिचुकले  रुग्णालयात भरती झाले आहेत.

२०१५ मधल्या एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर सातारा जिल्हा न्यायालयात न्या. आवटी यांच्याकडे खटला सुरू होता. मात्र वारंवार तारखा देऊनही न्यायालयात सुनावणीस अनुपस्थित राहिल्या नंतर न्या आवटी यांनी याप्रकरणी अटक करण्याचे आदेश (वारन्ट)दिल्यानंतर सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. मात्र आता तब्येतीचं कारण देत ते साताऱ्याच्या रुग्णालयात भरती झाले आहेत. 

जुने प्रकरण उगाचच उकरून काढलं जात आहे, आपल्याला घराबाहेर काढण्याचा हा राजकीय कट आहे असा आरोप त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती केला आहे. अभिजित बिचुकले हे संदीप सकपाळ यांना २८ हजारे देणे होते. मात्र चेक बाऊन्स झाला होता. अखेर हे प्रकरण न्यायलयात गेले. वारंवार तारखा देऊनही बिचुकले कोर्टात हजर राहत नव्हते म्हणून सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना बिस बॉसच्या सेटवरून शुक्रवारी अटक केली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Big Boss Marathi 2 Abhijit Bichukale claim that some people wanted to throw me out from big boss house