पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा-कोरेगाव प्रकरण : ३४८ गुन्हे मागे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही!

गृहमंत्री अनिल देशमुख

भीमा-कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिली. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सभागृहात याबाबत माहिती दिली. अनिल देशमुख म्हणाले की, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एकूण ६४९ गुन्हे दाखल आहेत. यातील ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे. सार्वजनिक मालमत्तेच नुकसान आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात जे गुन्हे  दाखल आहेत, ते गंभीर स्वरुपाचे असून हे गुन्हे मागे घेणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.   

'चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याची ही वेळ नाही'

पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी, २०१८ रोजी शौर्य दिनानिमित्त आलेल्या आंबेडकर अनुयायांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद नंतर राज्यभरात उमटले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी २०१८ रोजी राज्यव्यापी बंद पुकरण्यात आला होता. त्या बंदकाळात मोठा हिंसाचार झाला होता. या घटनेनंतर ६००हून अधिक गुन्हे दाखल झाले होते.  

अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्या अटकेच्या मागणीचा ट्रेंड

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणदिनाचे निमित्त साधून पुण्यातील भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात दाखल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.