पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एल्गार परिषदप्रकरणात NIA कडून नव्याने FIR दाखल

एल्गार परिषप्रकरणात नव्याने एफआयआर

एल्गार परिषदप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सोमवारी नव्याने एफआयआर दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात ९ जण सध्या तुरुंगात असून अन्य दोघांच्या नावाचाही यात समावेश आहे. या सर्वजणांवर दहशतवाद विरोधी तसेच भादंविच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र नव्या एफआयआरमध्ये संशयितांविरोधात देशद्रोहाचं कलम एनआयएने लावलेलं नाही.

होय तुम्ही दहशतवादी, जावडेकरांचा CM केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप

एल्गार परिषद आणि नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणाची सुनावणी पुण्यात होणार की मुंबईत यावर येत्या ६ फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे. या संदर्भातील सुनावणीसाठी पुणे विशेष न्यायालयाने सरकारी वकिलांना त्यांची बाजू मांडण्यासाठी येत्या गुरुवारपर्यंत अवधी दिला आहे. राज्य सरकार आढावा घेत असलेल्या एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने अचानक राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला होता.

... म्हणून काँग्रेस नेता शत्रुघ्न सिन्हांनी केला PM मोदींना सलाम

एल्गार परिषेदेच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले होते. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले जावे, अशी सूचना त्यांनी केली होती. राज्य सरकारच्या यादसंदर्भात हालचाली सुरु असताना केंद्र सरकारने २४ जानेवारी रोजी अचानक एल्गार परिषदेचा गुन्हा एनआयएकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारला न कळविता परस्पर गुन्हा हस्तांतरित केल्याने त्याचा निषेध केला होता़. यावरुन केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सध्या संघर्ष सुरु असल्याचे दिसत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bhima Koregaon Case new FIR registered with National Investigation of Agency No sedition charges against the accused