पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा-कारेगाव तपास NIAकडे : फडणवीसांकडून स्वागत, थोरातांची टीका

बाळासाहेब थोरात आणि देवेंद्र फडणवीस

पुण्यातील भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याच्या निर्णयाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आजचे राशिभविष्य | शनिवार | २५ जानेवारी २०२०

एएनआयशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा खटला केवळ महाराष्ट्राशी संबंधित नाही. शहरी नक्षलवादाचा प्रसार संपूर्ण देशात झाला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने योग्य पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे देशातील शहरी नक्षलवादाचा पर्दाफाश करणे शक्य होईल.

दुसरीकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र केंद्राच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, राज्य सरकारला विश्वासात न घेता भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास घाईघाईने राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय असंवैधानिक असून राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा प्रकार आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो.

'भारत-पाक महामुकाबला' ट्विटमुळे BJP नेत्याविरोधात FIR

राज्यातील गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही अशा पद्धतीने हा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.