पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत बंद: यवतमाळमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज, पुण्यात २५० जण ताब्यात

भारत बंदला हिंसक वळण

बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि ईव्हीएमच्या विरोधात भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला काही ठिकाणी हिंसक वळण आले आहे. पालघर आणि यवतमाळमध्ये पोलिसांनी आंदोलनकांवर लाठीचार्ज केला आहे. तर पुण्यामध्ये आंदोलन  करणाऱ्या २५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गर्भपातासाठीच्या कालावधीत वाढ, सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

यवतमाळमध्ये भारत बंदला हिंसक वळण आले आहे. शहरातील मुख्य रस्ता बंद करण्यावरुन वाद पेटला. पोलिस आणि आंदोलनकांमध्ये वाद झाला. या वादानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यवतमाळमध्ये बहुजन मुक्ती मोर्चाने बंदची हाक दिली होती. या घटनेमुळे यवतमाळ परिसरात तणावाचे वातावरण आहे.

सलमानवर गोव्यात बंदी घालण्याची काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची

पालघरमध्ये बंदच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण आहे. भारत बंद दरम्यान, पालघरमध्ये पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज करत काही जणांना ताब्यात घेतले. पालघर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बहुजन क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या बंदला पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.  बहुजन क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. 

पुन्हा अर्णवला भेटलो... कुणालचे नवे ट्विट, तीन विमान कंपन्यांची बंदी