पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हिडिओ कॉल करून तरुणाची नदीत उडी घेत आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

चोपडा तालुक्यातील (जळगाव) देवगाव येथील एका युवकाने तापी नदीच्या पुलावरुन २५० फूट खोल नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. रूपेश ज्ञानेश्वर महाजन (वय २१) आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तत्पूर्वी रुपेशने मित्राला व्हिडिओ कॉल करुन आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. 

सांगोल्यात विष प्राशन करुन पती-पत्नीची आत्महत्या

रुपेश हा औरंगाबादमधील एका कंपनीत कामाला होता. तो ११ जून रोजी आजोबांकडे देवगाव येथे आला होता. १२ रोजी सायंकाळी देवगावहून जळगावकडे जाणाऱ्या बसमध्ये तो बसला. त्यानंतर तो विदगाव पुलाजवळ बसमधून खाली उतरला. तिथून औरंगाबादेतील मित्राला व्हिडिओ कॉल करत, तुम्ही व्यवस्थित राहा. माझे हे शेवटचे बोलणे असून मी आत्महत्या करत आहे,' असे त्याने सांगितले. त्यानंतर काही वेळातच तापीच्या नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

इग्लंडमध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या भारतीयास ७ वर्षांची शिक्षा