राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरु झाली. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. बीडमध्ये काही विद्यार्थ्यांनी जमिनीवर बसून पेपर सोडवला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालक संतप्त झाले आहेत.
राज्यात NRC लागू होऊन देणार नाही: मुख्यमंत्री
बीड तालुक्यातील रायमोहा येथे अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा सेंटरवर भौतिक सुविधा नाही. बैठक व्यवस्था व्यवस्थित केली नव्हती. बैठक व्यवस्थेत लहान मुलाचे बँच होते. व्यवस्थित बसता येत नसल्यामुळे शेवटी जमिनीवर बसून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. महत्वाचे म्हणजे, जमिनीवर फरशी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना धुळीत बसून परीक्षा द्यावी लागली. परीक्षा विभागाच्या या हलगर्जीपणावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
'पुरोगामी, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्राचा डाव'