पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीडला पावसाने झोडपले; पोलिस ठाण्यात शिरले पाणी

बीड पाऊस

पावसाळा संपत आला तरी बीड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता. मात्र सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. सलग दोन तास झालेल्या पावसामुळे बीड शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. तसंच ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे अनेक घरात आणि दुकानात पाणी शिरले होते.

जैश ए मोहम्मदच्या नावात बदल, नव्या रुपात दहशतवादी कारवायांची तयारी

बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिस ठाण्यात गुडघाभर पाणी साचले होते. या पावासामुळे बीडमधील बिंदूसरा नदीला पहिल्यांदा पूर आला. पूराचे पाणी दगडी पुलावर आले आहे. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. दरम्यान, या पावसामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. बऱ्याच दिवसानंतर का होईना चांगला पाऊस पडल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. 

साताऱ्यांची पोटनिवडणूक जाहीर, असा आहे निवडणूक कार्यक्रम