पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानात पळून जाणाच्या प्रयत्नात असलेल्या गुज्जर खानला अटक

गुज्जर खानला अटक

पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंड गुज्जर खान याला अटक करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. बीड शहरातील सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद साजेद अली यांच्या हत्येप्रकरणात तो फरार होता. गेल्या अनेक दिवसांपासून बीड पोलिस त्याचा शोध घेत होते. बीड पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ४ राज्यात गुज्जरचा पाठलाग केला. अखेर पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गुज्जरला बुधवारी पोलिसांनी बीडमध्येच अटक केली. 

शेतकरी उगीच आत्महत्या करत नाहीत, शरद पवार यांचे सूचक वक्तव्य
 
सैनिकी महाविद्यालयाचे शिक्षक सय्यद साजेद यांची १९ सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. गुज्जरने साथिदारांच्या मदतीने त्यांची हत्या केली होती. हत्येनंतर गुज्जर फरार होता. बीडमध्ये गुज्जर खानविरोधात तब्बल २६ गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील प्रस्तावित आहे. तब्बल ४ दिवसांचा पाठलाग आणि ४ हजार किलोमीटरच्या प्रवासानंतर गुज्जरला अटक करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. गुज्जरजवळून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गुज्जर आणि त्याच्या साथिदारांची बालेपीर परिसरात मोठी दहशत आहे. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट, महागाई भत्त्यात ५ टक्के

शिक्षकाच्या हत्येनंतर पोलिस गुज्जरचा शोध घेत होते. आधी तो हैद्राबाद येथे गेला. त्याठिकाणावरुन तो दिल्लीला गेला. त्यानंतर तो अजमेर, माऊंट अबु आणि कच्छला गेला. याठिकाणावरु तो पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत होता. पोलिस पाठलाग करत होते मात्र ही बाब त्याच्या लक्षात आली नाही. यावेळी त्याने मोबाईलमध्ये सीमकार्ड टाकले. त्याठिकाणावरुन तो पुण्यात गेला त्याठिकाणी काही वेळ थांबला. मात्र पोलिस पाठलाग करत असल्याचे कळाल्यानंतर तो बीडला आहे. त्याठिकाणावरुन पोलिसांनी त्याला अटक केली. 

जागतिक आर्थिक मंदीचा भारतावरही परिणामः आयएमएफ प्रमुख