पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीड जि.प निवडणूकः हतबल पंकजा मुंडेंना पराभव मान्य

पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोप धनंजय मुंडे यांच्याव करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील स्थानिक समीकरणेही बदलताना दिसत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी सत्तेवर आली आहे. दरम्यान, बीड जिल्हा परिषदेतील चित्रही बदलताना दिसत आहे. बीड जिल्हा परिषदेची सत्ता पंकजा मुंडे यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. पंकजा मुंडे यांनी टि्वट करुन लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहे, असे म्हटले आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनीही पंकजा मुंडे यांच्या मताला दुजोरा दिला आहे.

बीड जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष होता. पण राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेवर आली. तोच परिपाठ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये करण्यात येत आहे. काही ठिकाणी या प्रयोगाला यश आले तर काही ठिकाणी महाविकास आघाडी निष्प्रभ ठरली. 

ठाकरे सरकारच्या पतनास सुरुवातः देवेंद्र फडणवीस

बीडमध्येही शिवसेनेने भाजपबरोबर जाण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे तिथे भाजपचा अध्यक्ष होणे कठीण आहे. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा परिषद येथे सकाळपासून ठाण मांडून बसले आहेत.

पंकजा मुंडे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही होत आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहे.

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत शिवसेना सोडणार ?