बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. केज तालुक्यातल्या गप्पेवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाकडून सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून 16 वर्षीय स्वाती घोळवे या तरुणीने आत्महत्या केली. 25 जुलैला स्वातीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
करमाळ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू 10 जण गंभीर जखमी
स्वाती घोळवे तिच्या मामाच्या गावी शिक्षणासाठी राहत होती. स्वाती यावर्षी 10 वीचे शिक्षण घेत होती. गावामध्ये राहणारा एक तरुण स्वातीची शाळेत जाता- येता छेड काढायचा. याबाबत स्वातीने तिच्या मामांकडे तक्रार केली होती. तिच्या मामाने या तरुणाच्या कुटुंबियांना याबाबत सांगत त्याला समजावण्यास सांगितले. वारंवार तरुणाला समजावून सांगून देखील या तरुणाने तिला त्रास देणे कमी केले नाही.
पक्षप्रवेश होत असले, तरी आमची युती अभेद्य - देवेंद्र फडणवीस
२५ जुलै रोजी आरोपी अशोक रामदास केदार याने शाळेत जावून स्वातीची छेड काढली. तसंच तिच्या मामाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या स्वातीने घरी येऊन विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वातीच्या कुटुंबियांनी तिला ताबडतोब आंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान स्वातीचा मृत्यू झाला.
आमच्या पक्षातील जुन्यांची काळजी करू नका, चंद्रकांत पाटील
या घटनेनंतर केज पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अशोक केदार हा सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी आरोपीच्या भावासह आईला ताब्यात घेतले आहे.