पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अन्नाच्या शोधात चंद्रपूरातील वीज केंद्रात शिरले अस्वल

चंद्रपूर अस्वल

चंद्रपूर येथील वीज केंद्रातील कोळसा हाताळणी क्षेत्रात बुधवारी अस्वलाचे दर्शन झाले. अन्नाच्या शोधात हे अस्वल याठिकाणी आले होते. मात्र काहीच न मिळाल्यामुळे ते परत निघून गेले. यावेळी या अस्वलाला पाहण्यासाठी वीज केंद्रातील कामगारांनी गर्दी केली होती.

'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'

चंद्रपूर वीज केंद्रातील कोळसा हाताळणी क्षेत्रातील एका खांबावर हे अस्वल चढते होते. याठिकाणी काही खायला मिळतेय काय याचा शोध हे अस्वल घेत होते. मात्र सगळीकडे कोळसा आणि लोखंडी यंत्र पाहून हे अस्वल खांबावरुन खाली उतरले आणि त्याठिकाणावरुन निघून गेले. 

'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा

आसपास काम करणाऱ्या कामगारांनी हे अस्वल पाहिल्यानंतर त्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. यापूर्वीही वीज केंद्रात अनेकदा अस्वल दिसून आले. या वीज केंद्राच्या आसपास मोठे जंगल आहे. त्यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर असतो. याआधी वाघ, बिबटे आणि अस्वल यांसारखे प्राणी येत असतात. 

जम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वाल्ते शहीद