दिल्लीतील मरकजसारखा प्रकार राज्यात खपवून घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात कोणत्याही जाती-धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोना विषाणूचे संकटातून आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी तो नॅशनल ट्रेंड नाही, कारण...
PM Narendra Modi discusses #coronavirus situation in #Maharashtra with CM Uddhav Thackeray on phone as the state has registered the highest number of cases in the country.
— Press Trust of India (@PTI_News) April 1, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील कोरोना विषाणूच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. विलगीकरणाचे पालन हे कोणत्याही परिस्थितीत व्हायला हवे. गर्दी टाळण्यासाठी तुमच्या अधिकारात योग्य तो निर्णय घ्या. दिल्लीतील मरकजप्रमाणे कोणताही प्रकार घडू नये याची दक्षता घ्या. जर असा प्रकार समोर आला तर अधिकाऱ्याला जाब विचारला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कोरोनाविरोधात भारत-चीन मिळून लढावे लागेल : मोदी
देशात लॉकडाऊन सुरू असताना दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलगी समाजाचे मुख्यालय असलेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडल्याचे समोर आले होते. या कार्यक्रमात भज्यातून काही लोक सहभागी झाली होती. विभागीय आयुक्तांनी राज्यातून सहभागी झालेल्यांची यादी तयार केली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी लोकांना स्वत:हून तपासणीला पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या सामूहिक कार्यक्रमामुळे कोरोनाग्रस्तांचा देशातील आणि राज्यातील आकडा मोठ्या संख्येने वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.