पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आज आणि ३१ डिसेंबरला पहाटे पाचपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी

प्रातिनिधिक छायाचित्र

नाताळनिमित्ताने २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहा ऐवजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे.  दारू आणि वाइन शॉप्स मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत तर बिअर बार पहाटे पाचवाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

मुंबई-पुणे महामार्गावर शालेय बसचा अपघात, १५ विद्यार्थी जखमी

प्रत्येकांनी या सणांचा आनंद घ्यावा यासाठी आम्ही मद्य विक्री करणारी दुकाने उशीरापर्यंत सुरु  ठेवण्याची परवानगी दिली असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागानं म्हटलं आहे. 

उद्या कंकणाकृती सूर्यग्रहण, राज्यात या वेळेत दिसणार ग्रहण

तर दुसरीकडे हॉटेल आणि ऑर्केस्ट्रा पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.  २५ आणि ३१ डिसेंबरसाठी ही परवानगी  देण्यात आली आहे.  यावेळात ग्राहकांची सुरक्षा, आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी हॉटेल मालकांवर असेल अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली.