पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हरियाणातील फॉर्म्युल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' आणखी वाढली

उद्धव ठाकरे, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हरियाणामध्ये सत्ता स्थापनेसाठी सहा जागा कमी असल्याने भाजपने तेथील जननायक जनता पक्षाशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबदल्यात जननायक जनता पक्षाला राज्यात उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे. मग या सूत्रानुसार महाराष्ट्रातही सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिवसेनेची मोठी गरज लागणार आहे. मग त्या बदल्यात शिवसेनेला काय काय दिले जाणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. राज्यात सत्ता स्थापन कऱण्यासाठी विधानसभेत १४५ सदस्यांची गरज आहे. भाजपकडे सध्या १०५ जागा आहेत. त्यामुळे त्यांना ४० जागांची गरज आहे. या स्थितीत शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.

कोकण किनारपट्टीला 'क्यार' चक्रीवादळाचा धोका

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून जेवढ्या जागा मिळतील, असे सांगितले जात होते. तेवढ्या जागा त्यांना मिळाल्या नसल्याचे निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपपुढे खरंतर मोठी अडचण निर्माण झाली आहे. २०१४ मध्ये भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी त्यांना बहुमतासाठी २३ जागांचीच गरज होती. त्यामुळे भाजपने शिवसेनेला महत्त्वाची कोणतीच खाती दिली नव्हती. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपदही दिले नव्हते. शिवसेनेमध्ये त्यावेळी यावरून नाराजी होती. पण पाच वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयम दाखवून भाजपने जे दिले, त्यावर आपल्या पक्षाचा सरकारला पाठिंबा कायम ठेवला होता.

आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. हरियाणामध्ये केवळ सहा जागांची आवश्यकता असतानाही भाजपने तेथील सरकार बनविण्यासाठी जननायक जनता पक्षाला उपमुख्यमंत्रीपद देऊ केले आहे. त्यामुळे मग महाराष्ट्रात ४० जागांसाठी शिवसेनेला काय काय मिळू शकते, याची चर्चा होऊ लागली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना मुख्यमंत्रीपदावरही दावा करू शकते. मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे भाजपकडे आणि उर्वरित अडीच वर्षे शिवसेनेकडे अशीही मागणी केली जाऊ शकते. त्याचबरोबर गृहमंत्रीपद, महसूलमंत्रीपद, कृषिमंत्रीपद, अर्थमंत्रीपद, शिक्षणमंत्रीपद अशा महत्त्वाच्या खात्यांवरही शिवसेना दावा सांगू शकते. भाजपला शिवसेनेच्या मागण्या यावेळी ऐकून घ्याव्या लागणार आहेत आणि त्यांचे समाधान होईल, असाच तोडगा काढावा लागणार आहे, हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसते.

सेनेचा प्रस्ताव आल्यास हायकमांडसोबत चर्चा करु- काँग्रेस

भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवाळीनंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. त्यावेळीच युती संदर्भातील चर्चा पुढे सरकेल आणि कोणाला काय मिळणार हे स्पष्ट होईल.