पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करमाळ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू 15 जण गंभीर जखमी

सोलापूर इमारतीचा स्लॅब कोसळला

सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. करमाळ्यातल्या बॅक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. तर ढिगाऱ्याखाली आणखी 20 जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु आहेत. 

करमाळा शहरातील सागर चित्रपटगृहाशेजारी असणाऱ्या इमारतीत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास बँकेतील स्लॅब अचानक कोसळला. यामध्ये बँकेतील कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. ढिगाऱ्याखालून 16 जखमींना काढण्यात आले. त्यामधील एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या 15 जणांवर करमाळ्याच्या कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.