पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्रीपदाचे तर ठरले पण महाविकास आघाडीत इतर कोणाला काय मिळणार?

हयात हॉटेलमध्ये सर्व नेते एका छताखाली

महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण आता या नव्या आघाडीत इतर सहभागी पक्षांना कोणती पदे मिळणार हे पाहणे सर्वांसाठी महत्त्वाचे असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रीपदे असणार आहेत. काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

'आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर सुरक्षित उतरलं'

बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या अजित पवार यांचे नव्या सरकारमध्ये स्थान काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित पवार यांना मंत्रिपद मिळणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. तिन्ही पक्षांनी अजून कोणाला किती मंत्रिपदे मिळणार हे स्पष्ट केलेले नाही. तिन्ही पक्षांमध्ये सध्या याच विषयावरून चर्चा सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीत ५६ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला एकूण १५ मंत्रिपदे आणि मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. काँग्रेसला १३ मंत्रिपदे आणि विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीला नव्या सरकारमध्ये १४ ते १५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासह एकूण ४३ मंत्रिपदे देण्यात येऊ शकतात.

मला सध्या काहीही बोलायचं नाही.., अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना स्वतःकडे नगरविकास आणि अर्थ खात्याचे मंत्रिपद ठेवण्यासाठी आग्रही आहे. त्याचबरोबर उद्योग, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण ही सुद्धा मंत्रिपदे स्वतःकडे ठेवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. महसूल, कृषी, सामाजिक न्याय, गृहनिर्माण आणि ग्राम विकास ही खाती आपल्याला मिळावीत, यासाठी काँग्रेस आग्रही आहे. गृह, जलसिंचन, आदिवासी विकास या खात्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. विधान परिषदेतील अध्यक्षपदासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे.