पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा, मुख्यमंत्र्यांचा शिवसैनिकांच्या हस्ते सत्कार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत  आज वांद्रे- कुर्ला संकुलात शिवसेनेच्या  वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे येईल असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना दिलेल्या वचनाची पूर्तता झाली.  याचाच आनंद साजरा करण्यासाठी शिवसेना  जल्लोष करणार आहे.  

 

मनसे महाअधिवेशन : 'इंजिना'ला नवी दिशा मिळणार?

शिवसेनेच्या  ज्येष्ठ  ११ कार्यकर्त्यांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार होईल.  शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून पक्षाच्या सोबत असलेल्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष कार्यक्रमात शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, सोनाली कुलकर्णी, नीलेश साबळे, भाऊ कदम, अजय-अतुल, सुखविंदर सिंग, शिवमणी आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

मनसे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट

 विशेष म्हणजे आजच्या दिवशी महाराष्ट्र नननिर्माण सेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशनही होणार आहे. या अधिवेशनापूर्वी मनसेनं सच्च्या शिवसैनिकांना मनसेत सामील होण्याचं  जाहीर आवाहन केलं होतं. एकीकडे शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा दुसरीकडे  महाअधिवेशन या दोन्हीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय पहायला मिळणार याची उत्सुकता जनतेला आहे.