पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबाद जळीतकांडातील महिलेचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादमधील अंधारी गावातील जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २ फेब्रुवारीच्या रात्री या महिलेला  आरोपीनं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात महिला ९५ टक्के भाजली होती.  तिच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र या महिलेची  मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.  

डोंबिवलीतील रस्ते झाले गुलाबी; मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते यास अटक केली असून, त्याला दहा फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार हा तरुण बार चालक असल्याचं समजत आहे. त्याने मंगळवारी रात्री उशीरा महिलेच्या घरात घुसून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्याने हे कृत्य का केले हे अद्याप समोर आलेले नाही. 

महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत: मुख्यमंत्री

आरोपी संतोष मोहिते हा अवेळी पीडित महिलेच्या घरी यायचा यावरून हा वाद झाला होता. या वादानंतर आरोपीनं  महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला  जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.