पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीएसटीच्या त्रासामुळे औरंगाबादमध्ये लघुउद्योजकाची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

गेल्या काही महिन्यांपासून थकीत जीएसटी व मंदीमुळे त्यांना वैफल्यग्रस्त झालेल्या एका लघुउद्योजकाने आत्महत्या केली. ही घटना औरंगाबाद शहरात घडली. सिडको वाळूज येथील साक्षीनगरीमध्ये राहणारे लघूउद्योजक विष्णू रामभाऊ काळवणे (वय ५३ मुळ रा.फुलशेवरा ता. गंगापूर) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने औरंगाबादच्या उद्योग वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

चोवीस तासांत संजय राऊतांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट

काळवणे हे भाड्याच्या गाळ्यात गणेश इंडस्ट्रीज नावाने बफिंग शॉपला सुरुवात केली होती. येथे १० कामगार काम करत होते. काही दिवसांपासून मंदीमुळे काळवणे अस्वस्थ होते. गेल्या काही महिन्यांपासून थकीत जीएसटी व मंदीमुळे त्यांना वैफल्य आले होते. तशी चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात केंद्राचा मोठा खुलासा