पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंविरोधात औरंगाबादमधील पोलिस ठाण्यात तक्रार

उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. मुख्यमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेना याच्यातील युती तुटली. त्यानंतर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांच्यामध्ये चर्चांवर चर्चा सुरु आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या सत्ता स्थापनेला विरोध होताना पहायला मिळत आहे. औरंगाबादमधील एका वकिलाने चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणूक करुन मत घेतल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी या वकिलाने केली आहे. 

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; ठाकरे-पवार यांच्यात एकतास चर्चा

रत्नाकर भिमराव चौरे असं या वकिलाचे नाव आहे. त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात उद्धव ठाकरे  यांच्यासह शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. विधानसभा निवडणुकी दरम्यान उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये प्रचार सभा झाली. या प्रचार सभे दरम्यान त्यांनी महायुतीला निवडून द्या असे म्हटले होते. हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी, हिरवा गाडण्यासाठी महायुतीला मतदान करा असे सांगितले होते. 

सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसला 'न्याय' मिळणार का?

या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवत चौरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान केला आणि निवडून आणले. मात्र निकालानंतर शिवसेनेने भाजशी युती तोडून सरकार स्थापन केले नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले मतदान वाया गेले आहे. उद्धव ठाकरे यांनी फसवणूक केल्यामुळे त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

'आमचं ठरलंय! सेनेसोबतच्या चर्चेनंतर अधिकृत घोषणा