पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबादमध्ये भाजपला धक्का; किशनचंद तनवाणी स्वगृही परतले

किशनचंद तनवाणी शिवसेनेत

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. औरंगाबादचे भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याच्यासोबत माजी महापौर गजानन बारवाल यांनी सुध्दा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दोघांनी हातामध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

अरविंद केजरीवाल-अमित शहांची भेट, दिल्लीच्या विकासासाठी करणार एकत्र काम

किशनचंद तनवाणी आणि गजानन बारवाल हे आधी शिवसेनेतच होते. किशनचंद तनवाणी हे शिवसेनेचे आमदार देखील होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तनवाणी आणि बारवाल यांच्यासोबत भाजप शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. 

अखेर इंदोरीकर महाराजांनी कायदेशीर नोटीसला दिले उत्तर

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तनवाणी यांनी सांगितले की, 'स्थानिक राजकारण आणि गटबाजीमुळे मी भाजपला रामराम ठोकला आहे. सध्या प्राथमिक स्थरावर मी आणि गजानन बारवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लवकरच काही पदाधिकारी आणि सहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील.', असे त्यांनी सांगितले. तनवाणी आणि बारवाल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार आहे. 

तुमच्यासारखे इतरांचेही हक्क आहेत, आंदोलकांशी मध्यस्थीचा प्रयत्न