पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तहसीलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

प्रातिनिधीक छायाचित्र

तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या तिघांना न्यायालयाने रविवारी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मयुर वाघमारे, आण्णा खडके, संताजी खडके यांना रविवारी परंडा न्यायालयात हजर करण्यात आले होते.  

पुणे-सोलापूर महामार्गावरील विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

परंडा तालुक्यामध्ये वाळू माफीयांनी धुमाकुळ घातला आहे. शनिवारी वाळू माफीयांवर कारवाई करण्यासाठी पथकासह गेलेल्या परंड्याचे तहसीलदार हेळकर यांच्या अंगावर वाळूने भरलेला टॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा या तिघांवर आरोप आहे. याप्रकरणी बारा जनासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारीच मयुर वाघमारे, आण्णा खडके, संताजी खडके या तीन अरोपींना अटक करण्यात आली होती. इतर अरोपी अद्याप पसार आहेत.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीही पेटले

परंडा तालुक्यामध्ये नदी घाटातील वाळू ठेके बंद असल्यामुळे वाळू माफियांकडून तालुक्यातील सिना नदी, उल्का नदीच्या विविध भागातून वाळूचे अवैध उत्खनन करून मोठया प्रमाणात चोरटी वाळू विक्री केली जात असल्याची खबर तहसिलदारांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर वाळू माफीयांवर कारवाई करण्यासाठी स्वतः तहसीलदार पथकासह गेले असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.