पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूक: २४ मतदारसंघात 'नारीशक्ती'

विजयी महिला आमदार

२८८ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये २४ जागांवर नारीशक्तींचा विजय झाला आहे. नव्या विधानसभेमध्ये २४ महिला आमदार पहायला मिळणार आहे. यामध्ये ११ विद्यमान महिला आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये २३५ महिला उमेदवारांना संधी दिली होती. मात्र त्यामधील फक्त २४ महिला आमदारांना विजय मिळवण्यात यश आले आहे. 

आदित्य, आता करून दाखवा; #AadityaTeraVaada ट्रेंडमध्ये

विधानसभेवर जाणाऱ्या २४ महिला आमदारांमध्ये १२ महिला आमदार भाजपच्या आहेत. तर काँग्रेसच्या ५, शिवसेनेच्या २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३  आणि अपक्ष २ महिला आमदारांचा यामध्ये समावेश आहे. अशा एकूण २४ महिला आमदार विधासभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मावळत्या विधानसभेमध्ये २२ महिला आमदार होत्या. त्यामध्ये २ आमदारांची वाढ झाली आहे. 

काँग्रेस सोडून भाजपत गेलेले अल्पेश ठाकोरही पराभूत

२४ विजयी महिला आमदार - 

भायखळा - यामिनी जाधव - शिवसेना

चोपडा - लता सोनवणे - शिवसेना

बेलापूर - मंदा म्हात्रे - भाजप

दहिसर - मनिषा चौधरी - भाजप

गोरेगाव - विद्या ठाकूर - भाजप

वर्सोवा - भारती लव्हेकर - भाजप

पर्वती - माधुरी मिसाळ - भाजप

कसबापेठ - मुक्ता टिळक - भाजप

नाशिक मध्य - देवयानी फरंदे - भाजप

नाशिक पश्चिम -  सीमा हिरे - भाजप

चिखली - श्वेता महाले - भाजप

जिंतूर - मेघना बोर्डीकर - भाजप

केज - नमिता मुंदडा - भाजप

शेवगाव - मोनिका राजळे -  भाजप

धारावी - वर्षा गायकवाड - काँग्रेस

सोलापूर मध्ये - प्रणिती शिंदे - काँग्रेस

वरोरा - प्रतिभा धानोरकर - काँग्रेस

अमरावती - सुलभा खोडके - काँग्रेस

तिवसा - यशोमती ठाकूर - काँग्रेस

देवळाली - सरोज अहिरे - राष्ट्रवादी काँग्रेस 

तासगाव - सुमनताई पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस 

श्रीवर्धन - आदिती तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस 

मीरा -भाईंदर - गीता जैन - अपक्ष

साक्री - मंजुळा गावित  - अपक्ष