पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा २०१९: गणपतराव देशमुख; वय ९३ वर्षे, उपस्थिती ९४ टक्के

शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख

महाराष्ट्र विधिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य आणि तब्बल ५५ वर्षांहून अधिक सांगोला (जि. सोलापूर) मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) आमदार गणपतराव देशमुख हे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. वयाची ९३ वर्षे पूर्ण केलेल्या गणपतराव देशमुखांची २०१४ ते २०१८ विधानसभेतील कार्यकाळातील उपस्थिती तब्बल ९४ टक्के आहे. उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकही आमदार त्यांच्या जवळपास नाही. २०१४ ते २०१८ या काळातील सर्व १३ अधिवेशनांमध्ये त्यांनी विधानसभेत १६ प्रश्ने मांडली होती. त्यांनी शिक्षण, पाणी आणि शेती विषयाशी निगडीत प्रश्ने उपस्थित केली होती. मुंबईतील संपर्क संस्थेने वर्ष २०१४ ते २०१८ या काळातल्या सर्व २८८ आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा सामजिक अंगाने अभ्यास केला आहे. या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. 

विधानसभा २०१९: पुणेकरांनो मत देण्यापूर्वी हा अहवाल नक्की वाचा

गणपतराव देशमुखांपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (८७ टक्के), पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके (८४ टक्के) यांच्या उपस्थितीचे, कामकाजात सहभागी होण्याचे प्रमाण आहे. 

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला आहे. 

हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांमुळे धक्काः सुप्रिया सुळे

देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

सभ्यपणाचा राष्ट्रवादीने गैरफायदा घेतला, हर्षवर्धन पाटलांचा आरोप

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Assembly election 2019 Peasants and Workers Party of India sangola assembly senior leader 93 year old mla ganpatrao deshmukh presence in assembly is 94 percent