पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात, आदेश द्यायचे असतात: मुख्यमंत्री फडणवीस

सातारा येथे आयोजित महाजनादेश यात्रेत सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साताऱ्यातील सर्व बेघरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मंजूर करुन देणार, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार, सिमेंट रस्त्यासाठी ५० कोटी देणार यासह विविध घोषणांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथील महाजनादेश यात्रेत पाऊस पाडला. तसेच छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात तर आदेश द्यायचा असतो. लोकशाहीमध्ये प्रजा हीच राजा आहे, असे ते म्हणाले. 

काम केल्यामुळंच भाजपला मतदान, ईव्हीएमवरुन उदयनराजेंचं घुमजाव

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. सत्ताधारीच यात्रा काढतात या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, विरोधात असताना आम्ही संघर्षाची यात्रा काढली होती. आता सत्तेत असताना आम्ही संवादाची यात्रा काढतोय. 

छत्रपतींचे घराणे हे देणारे घराणे आहे, घेणारे नाही. तुम्ही (राष्ट्रवादी) त्यांच्याकडून इतके घेतले. पण त्यांना काहीच दिले नाही. सातारकरांनी आजपर्यंतच्या विक्रमी मताधिक्याने उदयनराजेंना लोकसभेत तर विधानसभेत शिवेंद्रसिंह राजेंना पाठवा असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकरी आत्महत्याप्रकरणी खासदार ओमराजे राजेनिंबाळकरांवर गुन्हा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:assembly election 2019 maha janadesh yatra cm devendra fadnavis criticize on ncp and congress and announces various schemes for satara