पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर 'वंचित'मध्ये फूट, एमआयएमचा स्वबळाचा नारा

अखेर 'वंचित'मध्ये फूट, एमआयएमचा स्वबळाचा नारा

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात अखेर फूट पडली आहे. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपात सन्मान राखला नसल्याचे सांगत खासदार इम्तियाज जलील यांनी आघाडी होणार नसल्याचे औरंगाबाद येथे जाहीर केले. एमआयएम स्वबळावर जागा लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही फूट पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून एमआयएमची वंचितबरोबर बोलणी सुरु होती. राज्यात सन्मानजनक जागा मिळतील, अशी अपेक्षा एमआयएमला होती. परंतु, प्रकाश आंबेडकरांनी जास्त जागा देण्यास नकार दिल्याने निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा एमआयएमने शुक्रवारी केली. दरम्यान, ओवेसी यांच्या भूमिकेनंतरच आपली प्रतिक्रिया देऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

. या ४ कारणांमुळे भाजप-शिवसेनेत जागा वाटपावर लवकर एकमत होणे अवघड

राज्यातील २८८ जागांपैकी एमआयएमने ९८ जागा मागितल्या होत्या. त्यांनी ३० जागा लढण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, प्रकाश आंबेडकर हे फक्त ८ जागा देण्यास तयार होते. त्यामुळे खासदार जलील यांनी अखेर आज निवेदन जारी करुन एमआयएमची वंचितबरोबरची आघाडी होणार नसल्याचे म्हटले. अखेर ११ महिन्यांचा घरोबा आज संपुष्टात आला आहे.

विधानसभा २०१९: गणपतराव देशमुख; वय ९३ वर्षे, उपस्थिती ९४ टक्के

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Assembly election 2019 Aimim separate from vanchit bahujan aghadi contest independent imtiaz jalil prakash ambedkar