पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्यात २२,११८ खोल्या सज्ज : अशोक चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात २२,११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली आहे. या खोल्यांमध्ये  ५५,७०७ खाटांची सोय होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे सार्वजिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

लॉकडाऊन: १४ एप्रिलपर्यंत सर्व गाड्या रद्द, रेल्वेचा मोठा निर्णय

अशोक चव्हाण यांनी सांगितले की, 'कोरोनाविरूद्धच्या लढाईत दुर्देवाने आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली तर अशा परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात २२,११८ खोल्यांना सज्ज करण्यात आले आहे. या ठिकाणी ५५,७०७ खाटांची सोय होऊ शकेल. यामध्ये शासकिय इमारती, शासकिय विश्रामगृह, शासकिय कार्यलय आणि काही नवीन बांधलेल्या इमारतींचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी, शौचालय अशा सुविधा देखील उपलब्ध आहेत.'

कोविड-१९ : शेन वॉर्नने घेतली ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची फिरकी!

तसंच, मोठ्या प्रमाणात गरज भासली तर आपण सज्ज रहायला पाहिजे त्यामुळे या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या तशी परिस्थिती नाही. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. गरज भासली तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या उपाययोजना केल्या असल्याचे अशोक चव्हाणांनी सांगितले. तसंच, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशाला देण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ashok chavan says as a precautionary measure in the battle against coronaVirus around 22118 rooms have been kept ready