पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बींनी महाराष्ट्रास दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

अमिताभ बच्चन

संतसज्जनांच्या पालखीसमवेत हरीनामाचा जागर करत वैष्णवांची मांदियाळी गुरुवारी पंढरपूरात दाखल झाली. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा भावसागर पंढरपुरात लोटला. विठुनामाच्या गजरात लीन झालेल्या समस्त वारकऱ्यांना  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील शुभेच्छा दिला आहेत. 

आषाढी एकादशीनिमित्तानं अमिताभ बच्चन यांनी मराठीत ट्विट करत महाराष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत. विठ्ठल- रखुमाईची  कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहु दे अशी प्रार्थना बच्चन यांनी केली आहे. 

तर शुक्रवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची मागणी आपण विठ्ठलाकडे केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सर्व बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. 'विठूराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना!', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.