पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG: कोरोनाच्या पुढील सुंदर जगाच्या दिशेने जाताना...

कोरोना विषाणू (प्रतिकात्मक छायाचित्र)

मित्रांनो जगामध्ये गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. एक न दिसणाऱ्या विषाणूने अख्ख्या जगाला घाबरवून सोडला आहे आणि ज्यांचा सूर्य मावळत नव्हता त्यांना सूर्य उगवतो कधी आणि मावळतो कधी याची जाणीव ठेवण्याची संधी पण दिली नाही हे आपण पाहत आहोत. 

महत्त्वाचे म्हणजे या कोरोनाने आम्हाला काही शिकवलं आणि आम्ही काय शिकणार आहोत. कोरोनापासून बचाव करणाऱ्या मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केलेल्या. यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्राथमिकरित्या काय केले पाहिजे याच्या मार्गदर्शक सूचना आयुष व आरोग्य विभागाने जाहीर केल्या आणि सामाजिक माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या काही औषधी वनस्पतीचा काढा करून घेतला काही प्रमाणामध्ये प्रतिबंध बसू शकतो हे या सूचनांमध्ये मांडले गेले.

विमानसेवा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही: केंद्र सरकार

सोशल मीडियामध्ये दिग्गज कॉलनीतील लोकांच्या काही चर्चा काल पाहत होतो. आमच्या कॉलनीमध्ये झाडे भरपूर आहेत. आम्ही खूप सारे मोठे लॉन्स केले आहेत. कुंडीमध्ये पण शोभेची झाडे लावली. पण आमच्या आरोग्याची काळजी करण्यास उपयोगी पडणारी झाडे ना आमच्या कुंडीत आमच्या कॉलनीतील गार्डनमध्ये असा एक सूर दिसून आला. यापेक्षा म्हणजे एका ताईने तर मुद्दा मांडला की, आमच्या कॉलनीमध्ये आम्ही देशी झाडे लावलीच नाहीत. सौंदर्याच्या आभासी जगामध्ये आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आमच्या आसपास असणाऱ्या वनस्पती, झाडे, वेली आमचे आरोग्य नकळत सांभाळत असतात. हे समजून न घेता देखण्या पर्यावरण उभा करणाऱ्या मंडळींना आता तरी पारंपारिक आपल्या भागामध्ये असणाऱ्या स्थानिक वनस्पती, वेली, वृक्ष यांच्या औषधी उपयोग आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर करता येईल हे या निमित्ताने सर्वांनी समजून घेणे गरज आहे. कोरोनाच्या निमित्ताने आता तरी आम्ही आमच्या कुंड्यांमध्ये, अंगणामध्ये, कॉलनीमधील जागेमध्ये अशा प्रकारची वेळ आल्यावर ती उपयोगी येणाऱ्या तुळस, कोरफड, गुळवेल, लिंब आणि इतर औषधी महत्त्व असणाऱ्या साध्या साध्या वनस्पतींना आमच्या आयुष्यात घरात, कॉलनीत, शहरात आता जागा दिली पाहिजे, हे प्रत्येकाने समजून घेतल्यास पलीकडील जग अधिक आनंददायी बनवता येईल. ऑक्सिपार्क, मेडिकल गार्डनिंग या सारख्या नवसंकल्पना  या निमित्ताने समजून घेऊन राबविता येतील.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार पार, ५०० रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसरी अजून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ती शिकता येईल ती म्हणजे 'फार्मर फ्रेंड' अर्थात 'शेतकरी मित्र' बनण्याची आणि बनवून घेण्याची. लाखो लोकांनी या भितीने तात्पुरत्या स्वरूपात असेना शहरांमधून गावाकडे स्थलांतर केले आहे .शहरातील अनेकांना आता भाजीपाला फळे दैनंदिन लागणारे शेती उत्पादन आणि त्याचे महत्व या निमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. चांगल्या प्रकारच्या आरोग्यदायी फळे, भाजीपाला, कडधान्ये, डाळी जर आम्ही आता थेट आमच्या गावातल्या शेतकरी बांधवांकडून घेऊन शेतकरी मित्र होऊन स्वतःच्या कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबाला लागणाऱ्या वार्षिक शेती आधारित गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने एखाद्या शेतकऱ्याची मैत्री करून त्याच्याकडून वर्षभर लागणाऱ्या धान्य डाळी व भाजीपाला कशा पद्धतीने उपलब्ध होईल. हे करताना त्याला इतरही आपल्या मित्रमंडळींना जोडून देऊन शेतकर्‍याच्या मालाला चांगला बाजारभाव आणि आपल्या आणि आपल्या मित्रमंडळींना उत्तम प्रतीचे अन्न मिळण्याच्या दृष्टीने नियोजन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करता येईल.

प्रियांका गांधींना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी

आता गावांमध्ये पोहचलेल्या लाखो शहरवासीयांनी पुढील काही दिवसांमध्ये शेतकरी मित्र बनवून आपले आरोग्य सुरक्षित राहण्यास दृष्टीने शेतकरी मित्राच्या माध्यमातून एक सुरक्षा कवच निर्माण करायला मोठी संधी आहे. तसेच आता शहरांमध्ये असणाऱ्या परंतु ज्यांचे मित्र मंडळी गावांमध्ये आहेत त्यांच्याशी संपर्क साधून या साखळीचा भाग होऊन एक नवीन जग ज्यामध्ये गावाकडचा शेतकरी आणि शहरांमधला नोकरदार एकमेकाचे मित्र बनतील आणि खर्‍या अर्थाने ही मैत्री एका बाजूला शेतकऱ्याचे आयुष्य सुखी करेल आणि दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये असणारी एकाकीपणाची भावना या शेतकरी मित्रांना सोबत घेऊन कमी करता येईल यासाठी आता गरज आहे शहरातील या मित्र मंडळींनी आपला शेतकरी मित्र शोधण्याची आणि सामाजिक माध्यमे यामध्ये मोठी भूमिका अदा करू शकतील. आणि यातूनच कोरोना पलीकडच्या जगामध्ये एकमेकांना समजून उमजून एक आनंददायी समाज निर्मिती करता येईल आणि ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे हे विश्वची माझे घर ही उक्ती प्रत्यक्षात आणता येईल. कोरोनानेही समजून घेण्याची संधी आपल्याला दिली आहे. या संधीचे सोने सर्वांनी मिळून करूया, चला समाज मित्र बनू या. कोरोना पलीकडील या नव्या आरोग्यदायी पर्यावरण प्रेमाला आणि शेतकरी मित्र बनून शाश्वत आनंददायी जगण्याच्या या प्रवासात आम्ही ग्रामीण बंधू आपल्या कायम सोबत आहोत .चला मिळून पुढे जाऊया !!!
चला जग जिंकूया !!नव जग घडवूया!!!


- गुरू भांगे 
(लेखक शेतकरी व ग्रामीण अभ्यासक असून 'शेती आरोग्य पोषण' या क्षेत्रात काम करतात.)
godsentguru@gmail.com

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:article on coronavirus pandemic situation and environment agriculture written by guru bhange