पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट

संभाजी भिडे गुरुजी

शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकावेळी आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे बेळगाव कोर्टाने यांच्यावर अटक वॉरंट जारी केले आहे.  

CAA विरोधात नागपाड्यात आंदोलन करणाऱ्या २०० महिलांवर गुन्हा दाखल

कर्नाटक निवडणुकीच्या काळात बेळगाव मधील येळ्ळूर गावातील यात्रेनिमित्त कुस्तीचे मैदान भरले होते. यावेळी संभाजी भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान हे देशातील अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान आहे. या मैदानाला तोड नसून त्या माजी आमदाराला हे मैदान उद्धवस्त करायचे होते. त्याला त्याची जागा दाखवून द्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन मराठी बाणा दाखवा,  असे विधान संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणात केले होते.  

दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान, ७० जागेसाठी ६७२ उमेदवार

या सर्व विधानांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरुन बेळगाव पोलिसांनी संभाजीराव भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात २४ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.