पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: वुहानहून ८ महाराष्ट्रयीन लष्कराच्या खास विमानातून मायदेशी निघले

कोरोना विषाणूः अखेर चीनची परवानगी, भारत वुहानला पाठवणार विमान

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या जवळपास १२० लोकांना राजधानी दिल्लीत आणण्यात येत आहे. लष्कराच्या विशेष विमानातून या नागरिकांना भारतात आण्यात येणार असून यात ७० ते ८० भारतीय असून महाराष्ट्रातील आठ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्याच्या अश्विनी पाटील यांच्यासह कोल्हापूर, लातूर आणि मुंबईतील काही नागरिक या विमानातून भारतात येत आहेत. 

आता अमृता फडणवीस यांची आदित्य ठाकरेंवर थेट टीका

वुहानमधून लष्काराच्या विशेष विमानान दिल्लीत नेमके किती वाजता उतरणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. ज्या भारतीयांना चीनच्या वुहानमधून दिल्लीत आणण्यात येईल त्यांना १५ दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना आपल्या घरी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.   

अजित डोवाल यांच्याकडून दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागांची

साताऱ्यातील एका पत्रकाराच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्याच्या अश्विनी पाटील या चीनमध्ये असल्याचे समजले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून या महिलेसह महाराष्ट्रातील विविध भागातील कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्यांना सुखरुप मायदेशी आणण्यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Around 120 passengers including foreign nationals coming to Delhi 8 Maharashtra People also in army special plane