पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी सरकारविरोधात अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करणार?

अण्णा हजारे

माहितीचा अधिकार कायद्यामध्ये बदल करण्याचा भाजप सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. माहितीचा अधिकार कायद्यामध्ये बदल करणे म्हणजे जनतेला धोका दिल्यासारखे असल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. भाजपा सरकारचा निर्णय हा माहितीचा अधिकार कायद्याला कमकुवत करण्याचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. दरम्यान, माहितीचा अधिकार कायद्यासाठी मी पुन्हा आंदोलनाला बसेल असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. 

पहिले राफेल विमान सप्टेंबरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यात

माहितीचा अधिकार या कायद्यात बदल झाला तर हा कायदा सरकारच्या मर्जीने चालणार आहे. त्यामुळे आता जनतेनेच या कायद्याच्या संरक्षनार्थ रस्त्यांवर येण्याची गरज आहे. जर जनता यासाठी रस्त्यांवर उतरण्यास तयार असेल तर मी पुन्हा आंदोलन करेल असे अण्णा हजार यांनी सांगितले. मात्र हे आंदोलन सरकारच्याविरोधात नाही तर जनेतेच्या हक्कासाठी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट मत अण्णांनी व्यक्त केले आहे. 

अंधेरीत विचित्र कार अपघातात ८ जण जखमी

माहितीचा अधिकार कायद्यात बदल करण्याच्या निर्णयावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले मात्र भाजप सरकारवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकार हे जनतेला धोका देत आहे. त्यामुळे माहितीचा अधिकार या कायद्यात बदल करण्याचा निर्णय मागे घेवून जनतेला विश्वासात घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी अण्णांनी दिली आहे. 

यॉर्कर स्पेशलिस्ट मलिंगा निवृत्त होतोय!

दरम्यान, २००५ साली माहितीचा अधिकार कायदा अंमलात आल्यानंतर काँग्रेस सरकारने २००६ साली या कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आंदोलन करुन तो निर्णय हाणून पाडला. मात्र आता भाजप सरकारमधील काही लोकांना हा कायदा नकोय. त्यासाठी ते सत्तेचा दुरुपयोग करुन भाजपा सरकार केंद्रीय सूचना आयुक्तांना या कायद्यात समाविष्ट करून कायद्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका अण्णांनी केली आहे. 

PHOTOS : मुंबईला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं