पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंगणघाट प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात; उज्ज्वल निकम मांडणार बाजू

उज्ज्वल निकम

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम या प्रकरणातील पीडितेची बाजू कोर्टात मांडणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राहुल गांधींच्या त्या वक्तव्याला आसाममध्येही मोदींकडून प्रत्युत्तर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'वर्धा हिंगणघाट प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. हिंगणघाट प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकरणात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल. या खटल्याचा सर्व कायदेशीर खर्च राज्य सरकार करेल.'

वांद्र्यातील घुसखोरांचे मोहल्ले आधी साफ करा, मनसेची पोस्टरबाजी

दरम्यान, हिंगणघाट पीडितेवर नागपूर येथील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडितेची प्रकृती स्थिर पण गंभीर आहे. तिच्या शरिरात इन्फेकशन होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि पीडित तरुणीच्या उपचारासाठी ४ लाखांची मदत दिली आहे. या प्रकरणाकीव आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केले आहे.

राहुल गांधींच्या प्रश्नावरील उत्तरावरून लोकसभेत गदारोळ