पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंगणघाट प्रकरणी ग्रामस्थ संतप्त; पोलिस आणि रुग्णवाहिकेवर दगडफेक

हिंगणघाट - पोलिसांवर दगडफेक

हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पीडित तरुणीच्या दारोडा गावातील ग्रामस्थ देखील संतप्त झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-हैद्राबाद जुन्या महामार्गावर रास्तारोको केला. दरम्यान, पीडितेचे पार्थिव दारोडा गावात दाखल झाले आहेत. त्याचवेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांवर दगडफेक केली. दारोडा गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. 

सार्वजनिक रस्ता बेमुदत काळासाठी अडवू शकत नाही - सुप्रीम कोर्ट

हिंगणघाट पीडित तरुणीचा मृतदेह दारोडा गावात दाखल झाला आहे. ज्या रुग्णवाहिकेतून पीडितेचा मृतदेह आणण्यात येत होता त्या रुग्णवाहिकेवर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली. यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली आहे. याप्रकरणातील आरोपी विक्की नगराळे याला फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  

SC/ST कायद्यातील सुधारणा वैध, तक्रारीनंतर चौकशीआधी अटक शक्य

हिंगणघाट पीडित तरुणीचा सोमवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. सातव्या दिवशी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पीडितेचा मृतदेह दारोडा गावात दाखल झाला. सध्या पीडितेच्या घरामध्ये तिचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले आहेत. दारोडा गावावर शोकाकुल सध्या वातावरण आहे. पीडितेला अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. दारोडा गावात पीडितेच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार केले जाणार आहे. 

'मी भारतातच राहणार पण कोणताही पुरावा दाखवणार नाही'