पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिलांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी पोलिसांची 'होम ड्रॉप' सेवा

रात्री अपरात्री महिलांना पोलीस होम ड्रोप देणार

हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेले सामूहिक बलात्काराचे प्रकरण आणि महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन महिला सुरक्षिततेसाठी अधिक सजग झाले आहे. राज्यातील नागपूरसह, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि मुझफ्फरनगर पोलिसांनी सुमसान रस्ता आणि भयानक शांतता पसरलेल्या रस्त्यावर अडकेलेल्या महिलांना घरापर्यंत पोहचवण्यास मदतकार्य सुरु केले आहे. 

उन्नाव बलात्कार: ९० टक्के भाजलेल्या पीडितेवर दिल्लीत उपचार

आंध्र प्रदेशमधील ओनगोल, चिराला, कंदकुर आणि मर्कापूर याठिकाणी महिलांना घरापर्यंत सोडण्यासाठी 'आपत्कालीन घर पोहचवण्याची सेवा सुरु करण्यात आली आहे. अन्य शहरात देखील ही सेवा विस्तारित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कौशल यांनी दिली. मुजफ्फरनगर पोलीस अधीक्षक अभिषेक यादव म्हणाले की, शहरामध्ये अनेक महिला किंवा तरुणी रात्रीअपरात्री कामावरुन घरी येतात. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी महिला किंवा तरुणी पोलिसांची मदत मागू शकतात. आम्ही त्यांनी सुरक्षित घरापर्यंत पोहचवू. यापरिस्थितीत महिला पोलीसही त्यांच्यासोबत असेल, अशी माहितीही त्यांनी दिली. 

हैदराबाद मेट्रोचा मोठा निर्णय, महिला मिरची स्प्रे सोबत ठेवू शकणार

याशिवाय राज्यातील नागपूरमध्येही पोलीस महिला सुरक्षिततेच्या बाबतीत अधिक सतर्क झाले आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय म्हणाले की, महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पोलिसांकडून ठाम पाउल उचलणे गरजेचे होते. आदेशानुसार, रात्री ९ वाजल्यापासून सकाळी ५ वाजेपर्यंत १०० क्रमांकावर कॉल करुन महिला किंवा तरुणी घरापर्यंत सुरक्षित पोहचवण्यासाठी पोलिसांची मदत घेऊ शकतात. नागपूरमध्ये महिला मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी बाहेर पडत आहेत. त्यांना सुरक्षिततेबाबत विश्वास देण्याच्या दृष्टिने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.