पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : राज्यातील ७० टक्के कोरोनाग्रस्त २१ ते ५० वर्षे वयोगटातील

कोरोना विषाणूबाधित रुग्णावर उपचार सुरु असतानाचे संग्रहित छायाचित्र

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. देशात कोरोनाची लागण झालेल्या आकडा हा अकरा हजारहून अधिक झाला असून राज्यातील आकडेवारीने दोन हजारीचा टप्पा पार केला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीतील ७० टक्के रुग्ण हे २१ ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. तर उर्वरित रुग्ण हे पन्नाशीहून अधिक वयोगटातील आहेत. राज्यातील आतापर्यंत आढळलेल्या २८०१ रुग्णांपैकी २३३० रुग्णांच्या आधारावर ही टक्केवारी काढण्यात आली आहे.

देशातील १७० जिल्ह्यांवर हॉटस्पॉटचे संकट, आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत राज्यातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. बृहमुंबई महानगर पालिकेने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या मुंबई शहरात मागील २४ तासांत १८३ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांपैकी २५० हून अधिक कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली होती.  

वांद्र्यात गर्दी जमवण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या विनयला पोलिस कोठडी

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा चिंताग्रस्तरित्या वाढताना दिसत आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाकडून कोरोनाबाधित रुग्ण आढळणाऱ्या परिसर संपूर्णपणे सील करण्यात येत आहे. मुंबईसह पुण्यातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतानाचे चित्र आहे. या दोन शहरांशिवाय नागपूरमध्येही कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात कोरोनाचा फार मोठ्या प्रभाव झाल्याचे दिसत नाही. ही गोष्ट राज्याला थोडासा दिलासा देणारी असून ही परिस्थिती कायम ठेवत कोरोनाग्रस्तांचा शहरातील वाढता आकडा रोखण्याच आव्हान सरकारसमोर आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Analysis of 2330 of total 2801COVID 19 cases Maharashtra 70 percent or 1646 patients ranges between 21 and 50 years