पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

प्रातिनिधिक छायाचित्र

साताऱ्यात गुरुवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. गुरुवारी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याचे एएनआयने म्हटले आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.८ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिदू नक्की कुठे होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा आर्थिक हानी झाल्याचे वृत्त नाही. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर एएनआयने हे ट्विट केले आहे. ८.२७ मिनिटांनी पुन्हा एकदा या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.० इतकी होती.